आरोग्य विषयक नियम पाळा : प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याची गरज : डॉ. दामोदर नार्वेकर
प्रतिनिधी /पेडणे
आरोग्य खात्याने वोळोवेळी दिलेल्या सूचना पाळल्यास तोरसेतच काय कुठेच डेंग्यू किंवा इतर साथीचे रोग पसरणार नाहीत. नागरिकांनी सतत जागृत राहून आरोग्य आपल्या आरोग्याबाबत काळजी घेतली साथीच्या रोगांचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही, असे मत कासारवर्णे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर नार्वेकर यानी तोरसे येथे व्यक्त केले.
काही दिवस तोरसे धनगर वाडय़ावर डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पेडणे तालुका विकास समीतीच्या पदाधिकाऱयांनी समितीच्या माध्यमातून आरोग्य खात्याकडे संपर्क साधुन परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर आरोग्य खात्याचे वरि÷ अधिकारी डॉ. श्रीपाद आर्लेकर यांनी जातीनिशी लक्ष घालून कासारवर्णेचे आरोग्याधिकारी डॉ. दामोदर नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने तोरसे धनगर वाडय़ावर पाठवले.
या वेळी पेडणे तालुका विकास समीतीचे प्रतिनिधी पत्रकार उमेश गाड, डॉ. दीपाली फातर्पेकर, वैदकीय तपास निरीक्षक संतोष शेटकर, सदुराज नाईक, बापू नाईक, गीता पाटील, सांगवी गुरव, दीक्षा परवार, तकाराम माटे, आदी होते.
पेडणे तालुका विकास समीतीच्या वतीने बोलताना पत्रकार उमेश शंकर गाड यांनी नागरिकांनी आजारपण लपवू नये, आपल्यास आरोग्य विषयकच नव्हे तर सामाजिक कक्षेत्रातही कुठलीही समस्या असल्यास पेडणे तालुका विकास समीती सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
डॉ. दिपाली फातार्फेकर यानी पावसाळय़ात घ्यावयाची काळजी व वेगवेगळय़ा साथींची लक्षणे या विषयी माहीती दिली. संतोश शेटकर यांनी पेडणे तालुका विकास समीतीच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी उमेश शंकर गाड यांच्या हस्ते वाडय़ावरील 25 कामगारांना मोफत मच्छरदाणीचे वितरण करण्यात आले. तसेच अनेकाची मोफत रक्त तपासणी करण्यात आली व संपूर्ण वाडय़ावर डांस प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. तसेच या वाडय़ाची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली.
पेडणे तालुका वीकास समीतीने धनगर वाडय़ावरील लोकांबद्दल दाखवलेल्या सहानुभुती बद्दल धनगर वाडा नागरीक रमेश बुटे व दुलु कोकरे यानी आभार मानले आहेत.