Tarun Bharat

दौडमधून लम्पिस्कीनबाबत जागृती

Advertisements

हलगा-बस्तवाडमध्ये हलत्या देखाव्यांतून गो-मातेच्या रक्षणाचा संदेश : उपक्रमामुळे पशुपालकांसह शेतकऱयांतून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

तालुक्मयात लम्पिस्कीन संसर्गजन्य रोगाने थैमान माजविले आहे. अनेक जनावरांना या रोगाची लागण झाली असून शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. रोगापासून जनावरांना दूर ठेवण्यासाठी हलगा-बस्तवाड येथे दौडमधून लम्पीबाबत जागृती केली जात आहे. हलते देखावे सादर करून गो-मातेचे रक्षण झाले पाहिजे, असे संदेश दिले जात आहेत. या उपक्रमामुळे पशुपालक शेतकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हय़ासह तालुक्मयात लम्पिस्कीन विषाणूजन्य रोगाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांची झोप उडाली आहे. बाधित जनावरापासून या रोगाचा फैलाव होतो. विशेषतः डास, माशा, गोचिड आणि चिलटे यापासून या रोगाचा प्रसार होतो. यासाठी जनावरांना बाहेर सोडू नका, गो-मातेची काळजी घ्या, जनावरांवर मच्छरदाणीचा वापर करा, असे संदेश देणारे देखावे दौडमध्ये पाहायला मिळाले. हलगा, हलगा-बस्तवाड, मुतगा आदी गावांतून सुरू असलेल्या दौडमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.

बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. विशेषतः पूर्वभागात या रोगाची लागण झालेली जनावरे अधिक आहेत. शिवाय शेकडो जनावरे दगावली आहेत. बाधित जनावरांवर उपचार होत असले तरी रोगाची तीव्रता अधिक असल्याने जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी धास्तावले आहेत. जुने बेळगाव आणि शहापूरमध्ये दुभत्या गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे गो-माता जगली पाहिजे आणि गो-मातेचे संवर्धन झाले पाहिजे या हेतूने तरुणांनी दौडमध्ये देखावे सादर केले आहेत. या देखाव्यांमध्ये पशुपालक आपल्या गाय, बैल आणि वासराची काळजी घेत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले आहे. त्यामुळे दौडमध्ये हे देखावे आकर्षण ठरत आहेत.

पशुसंगोपन खात्याकडून रोग नियंत्रणासाठी गोठय़ात कडूलिंबाच्या पाल्याचा धूर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी देखाव्यांमध्ये कडूलिंबाच्या पाल्याचा धूर केल्याचे दृश्य दाखवून जागृती केली जात आहे. हलगा, बस्तवाड येथील युवक मंडळांनी लम्पीबाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Related Stories

15 ऑगस्टनंतर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा विचार

Amit Kulkarni

कोरे, जेड गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

नावगे क्रिकेट स्पर्धेत गणेश स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

सार्वजनिक ठिकाणी पान-तंबाखू खाताय सावधान !

Patil_p

अरुण चौगुले यांची शांताई वृद्धाश्रमाला मदत

Amit Kulkarni

बिबटय़ाचा चकवा, शोधमोहिमेचा फज्जा

Amit Kulkarni
error: Content is protected !!