आज जागतिक ल्युपस दिन : अवयवांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित निदानासह उपचार घेणे महत्त्वाचे
प्रतिनिधी /बेळगाव
आज जागतिक ल्युपस (एसएलई) दिवस आहे. ल्युपस म्हणजे आपल्या शरीरातील संरक्षण यंत्रणा आपल्याच अवयवांवर हल्ला करते. संधीवाताच्या आजाराचाच तो एक प्रकार असून या आजारात केवळ सांध्यांनाच दुखणे उद्भवत नाही तर त्याबरोबरच लिव्हर, किडणी यांनाही इजा होवू शकते. यामुळे आजच्या दिवशी प्रामुख्याने या रोगाबाबत जागृती केली जाते.
ल्युपस प्रामुख्याने स्त्रिया आणि कधीकधी मुलांनादेखील होतो. या आजाराचे निदान होण्यासाठी आठवडे ते महिने लागू शकतात. रुग्णाला सांधेदुखी, चेहऱयावर, त्वचेवर पुरळ येणे, किडनी निकामी होणे, पक्षाघात यांसारख्या गंभीर परिस्थितींसारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे अवयवांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दुर्दैवाने रोगाची लक्षणे एकाच वेळी असू शकत नाहीत म्हणून निदानासाठी आधीच्या लक्षणांशी संबंध जोडणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी एसएलई रोग कुटुंबातील इतर सदस्यांनादेखील होऊ शकतो. ल्युपस म्हणून निदान करण्यासाठी मूलभूत आणि विशेष चाचण्या आवश्यक आहेत.
आपल्याला सूर्याच्या कोवळय़ा उन्हाचा लाभ घेण्याची सूचना अनेकदा केली जाते. परंतु या आजारात सूर्याच्या प्रखरतेपासून जपणे आवश्यक आहे. व्यायाम, योग्य आहार महत्त्वाचा ठरतो. नवीन वैद्यकीय उपचार विशेषतः जैविक औषधांमुळे या रोगाला नियंत्रित करता येते. कमी डोस आणि कमी कालावधीचे स्टेरॉईड रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
स्वच्छता अत्यंत महत्त्वाची
स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे कारण संसर्गामुळे उपचार गुंतागुंतीचे होऊ शकतात आणि ते जीवघेणे ठरू शकतात. गर्भधारणेदरम्यान औषधांमध्ये बदल करणे आवश्यक आहे म्हणून डॉक्टरांना त्याबद्दल पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. शरीरातील अनेक समस्या लक्षात घेता, दीर्घ उपचार कालावधी या रुग्णांना भावनिक, सामाजिक, आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. जेणेकरून ते रोगाविरुद्ध लढा चालू ठेवू शकतील.
एकूणच, ल्युपस हा एक उत्तम नक्कल करणारा आहे जो आपल्याला गोंधळात टाकू शकतो म्हणून तो नेहमी संशयाच्या कक्षेत असतो. इतर लक्षणांसह किंवा त्याशिवाय सांधेदुखी असलेल्या तरुण स्त्रियांना ल्युपस होण्याची शक्मयता वाढली आहे. औषध वेळेवर घेणे महत्त्वाचे आहे.