प्रतिनिधी/ बेळगाव
लायन्स क्लब 317 बी च्यावतीने एकदिवशीय कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रिक्षाचालकांचा सहभाग होता. यावेळी क्लबतर्फे रिक्षांचे मोफत एमिशन टेस्टिंग करून घेण्यात आले. एकाच वेळी हुबळी येथील 3, बेळगाव येथील 2 तसेच धारवाड, होन्नावर, शिरसी, इलकल येथील क्लबमध्येसुद्धा कार्यक्रम झाला.
क्लबच्या जिल्हा समन्वयक भारती वडवी यांनी प्रांतपाल सुग्गला यलमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी केला. यासाठी चेअरपर्सन उदय बाडकर, ज्योती भट्ट, आरती कमलापूर, रावसाहेब देसाई, डॉ. नितेश जैन यांचे सहकार्य लाभले.