Tarun Bharat

खानापूर शहरात मोर्चाबाबत जनजागृती

Advertisements

प्रतिनिधी /खानापूर

सोमवार दि. 27 रोजी मराठी कागदपत्रे मिळविण्यासाठी बेळगाव येथे होणाऱया  विराट मोर्चात सहभागी होण्याबाबत म. ए. समितीच्यावतीने खानापुरात जागृती मोहीम घेण्यात आली. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने म. ए. समिती खानापूरच्या वतीने दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेत फिरून मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात पत्रके वाटून आवाहन करण्यात आले.

यावेळी आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, महेश प्रभू, डी. एम. भोसले, देवाप्पा गुरव, नारायण कापोलकर, शामराव पाटील, नारायण पाटील, मऱयाप्पा पाटील, धनंजय पाटील, निलेश पाटील, दामोदर देसाई, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, किरण पाटील, गोपाळ देसाई, विनायक सावंत, निरंजन सरदेसाई, राजाराम सरदेसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका युवा समितीचा पाठिंबा

सोमवार दि. 27 रोजी मराठी कागदपत्रे मिळविण्यासाठी बेळगाव येथे होणाऱया  विराट मोर्चात सहभागी होण्याबाबत खानापूर तालुका युवा समितीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

बेळगाव येथे सोमवार दि. 27 रोजी होणाऱया मोर्चात तालुका म. ए. युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून मराठी अस्मितेचे दर्शन घडवावे. तसेच कर्नाटक सरकारला मराठी परिपत्रके देण्यास भाग पाडावे, यासाठी बेळगाव येथील मोर्चात युवा समितीच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होऊन मराठी अस्मिता दाखवून द्यावी, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील यांनी केले आहे.

Related Stories

सॅनिटायझर केंद्राचे अधिकाऱयांना वावडे

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

Patil_p

‘ऑक्सिजन चॅलेंज’ अभियानांतर्गत अभाविपतर्फे वृक्षारोपण

Amit Kulkarni

शेषगिरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अशोक आयर्न वर्क्सला भेट

Amit Kulkarni

युवा समितीतर्फे सर्वमला आर्थिक मदत

Amit Kulkarni

कार – दुचाकी अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Rohan_P
error: Content is protected !!