प्रतिनिधी / बेळगाव
कोल्हापूर सर्कल येथील दिशा फिजिओथेरपी क्लिनिक येथे नुकतेच मोफत सांधे दुखी तपासणी शिबिर पार पडले. फिजिओ थेरपिस्ट डॉ. बसवराज नंजण्णावर यांनी हे शिबिर आयोजित केले होते. प. पू. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामी या मौन तपस्वींच्या 80 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे शिबिर घेण्यात आले.
यावेळी डॉ. बसवराज नंजण्णावर म्हणाले, आपल्या बैठय़ा जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आपण लहान-सहान कामांसाठीसुद्धा उपकरणांवर अवलंबून आहोत. अलीकडच्या नोकऱयासुद्धा बैठय़ाच असल्याने शरीराची आवश्यक हालचाल होत नाही व त्यामुळे संधिवात उद्भवतो. संधिवाताचा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक परिणामही होतो. व्यक्तीला वेदना होतात, शिवाय त्यातून स्थुलत्व, मधुमेह असे आजार उद्भवतात. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. 50 हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, संकेश्वर, चिकोडी व विजापूर येथून रुग्ण आले होते.