प्रतिनिधी/ बेळगाव
भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष विनय कदम यांच्या नेतृत्वाखाली दि. 20 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबत कल्लेहोळ, बेळगुंदी, बेळवट्टी, बडस या गावामध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी मराठा संघटन अध्यक्ष नारायण झंगरुचे, वारकरी सेवा प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष परशराम तुप्पट, जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.