बेळगाव / प्रतिनिधी
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. रायगड येथील पुनर्रस्थापित केल्या जाणाऱया 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी दौडदरम्यान कर्तव्य निधी जमा केला जाणार आहे. सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा योजना आखण्यात आली असून धारकऱयांनी दौडदरम्यान नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले.
शिवप्रति÷ान हिंदुस्थानची महत्त्वपूर्ण बैठक वडगाव येथील दत्त मंदिर येथे पार पडली. या बैठकीत दौडच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली. यावषीच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला असून तो बदल धारकऱयांना सांगण्यात आला. यावेळी दौडदरम्यान येणाऱया समस्यांविषयी चर्चा करण्यात आली.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावषी भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर यादरम्यान दौड काढण्यात येणार आहे. यावषी शहरासोबतच बेळगाव तालुका, खानापूर, निपाणी या परिसरातही भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. बैठकीला शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, अमोल केसरकर, अजित जाधव, विनायक कोकितकर, भास्कर पाटील यासह मोठय़ा संख्येने शिवप्रति÷ानचे धारकरी उपस्थित होते.
प्रत्येक घरावर भगवा फडकवा
हिंदुत्वाचे प्रतीक असणारा भगवा ध्वज दौडदरम्यान प्रत्येक घरावर फडकवावा. ज्या विभागात दौड आहे त्या त्या विभागातील प्रत्येक हिंदू घरावर भगवा ध्वज फडकवा. यामुळे धार्मिक वातावरण तयार होईल, असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले.