Tarun Bharat

नौदल वाद्यवृंदांकडून अप्रतिम संगीत मैफल

Advertisements

माजी नौदल कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजन : सुंदर गीतांचे सादरीकरण : आरपीडी मैदानावर रसिकांची गर्दी

प्रतिनिधी /बेळगाव

कारवार येथील भारतीय नौदल वाद्यवृंद (नेव्हल बॅण्ड कॉन्सर्ट) ने अप्रतिम अशी संगीत मैफल रविवारी सादर केली. आरपीडी मैदानावर झालेल्या या मैफलीमध्ये जवानांनी शिस्तबद्धरित्या संगीत सादर केले. एकाहून एक अशा सुंदर गीतांना बेळगावच्या रसिकांनीही टाळय़ांच्या कडकडाटात दाद दिली. बेळगावमध्ये प्रथमच नौदलाच्या बॅण्डचे वादन झाल्याने ते पाहण्यासाठी आरपीडी मैदानावर रसिकांची मोठी गर्दी झाली होती.

माजी नौदल कर्मचारी संघटनेच्यावतीने मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, माजी नौदल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील, सेपेटरी राजीव साळुंखे, उद्योजक विनायक लोकूर, नेव्हल कमांडर सत्यनाथ भोसले, आर. आर. पाटील उपस्थित होते.

आरपीडीमध्ये देणार अधिकारी घडविण्याचे प्रशिक्षण

भारतीय नौदल, वायूदल व भूदलाचे जवान रात्रंदिवस देशाचे संरक्षण करत आहेत. त्यामुळेच आम्ही येथे सुखाने जीवन जगत आहोत. मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे प्रेरणास्थान आहेत. कान्होजी आंग्रेंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी किनारपट्टी भागात स्वराज्य स्थापन केले. ज्याöज्या वेळी भारतावर युद्धजन्य परिस्थिती आली त्या-त्या वेळी नौदलाने आपली भूमिका चोख बजावली. बेळगावने सोमण व कुलकर्णी असे दोन एअरमार्शल देऊन नौदलात आपले योगदान दिले आहे. हीच परंपरा पुढे सुरू रहावी यासाठी आरपीडी महाविद्यालयात सैन्यदलात अधिकारी घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विविध युद्धात सहभागी झालेल्या जगदीश पाटील, कृष्णा कुरी, सुभाष पाटील, अशोक जाधव, पुंडलिक जाधव, एम. बी. लाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उद्योजक विनायक लोकूर यांनी माजी नौदल कर्मचारी संघाचे कौतुक करत यापुढेही असे कार्यक्रम व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी एनसीसी छात्र व नौदल वाद्यवृंदाच्या उपस्थितीत सुंदर पद्धतीने पथसंचलन सादर करण्यात आले.

हिंदी गीतांनी कार्यक्रमाला आणली रंगत

नौदलाच्या बॅण्डने हिंदी गीतांची उत्कृष्ट अशी मैफल सादर केली. ‘मेरा ईश्क सुफियाना’ या गीताला रसिकांनी टाळय़ांची दाद दिली. याचबरोबर 70 च्या दशकातील गाण्यांनी निवृत्त अधिकाऱयांची मने जिंकली. जुन्या गीतांसोबतच नव्या हिंदी गीतांचा नजराणा बॅण्डमधील कलाकारांनी सादर केला. मास्टर चीफ म्युझिशियन बी. के. बारीक यांच्या मार्गदर्शनाखाली मैफल सादर झाली.

Related Stories

पोवडय़ातून जागविला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास

Patil_p

गांजा पिकविणाऱया शेतकऱयाला अटक

Amit Kulkarni

चिकोडी सीबीसी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी

Patil_p

टायकॅथॉन उपक्रमांतर्गत टाकावू बाटल्यांपासून विविध प्रतिकृती

Amit Kulkarni

क्मयूआर कोड स्कॅन उपक्रमाचे गोगटे महाविद्यालयात उद्घाटन

Amit Kulkarni

जीत जानवेकरला कराटे स्पर्धेत सुवर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!