नवी दिल्ली
ऍक्सिस बँकेने मॅक्स फायनान्शीयल सर्व्हिसेसमधला 7 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा विचार चालवला असून यासंबंधी फेरकरार नुकताच कंपनीने केला आहे. यायोगे कंपनी आगामी काळात मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील वरील वाटा हस्तगत करु शकणार आहे. इरडा या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ऍक्सिस बँकेने पुन्हा फेरकरार बनवून तो सादर केला आहे.