‘ब्लॅक’मधील बाल कलाकार
संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात राणी मुखर्जीच्या बालपणीची व्यक्तिरेखा साकारणाऱया आयशा कपूरचे मोठे कौतुक झाले होते. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सुमारे 17 वर्षांनी आता आयशा चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडली गेली आहे. आयशा आता ‘हरि ओम’ या चित्रपटात दिसून येणार आहे. यात ती अंशुमन झासोबत काम करणार आहे.
मागील 17 वर्षांमध्ये आयशाने अभिनयाचे धडे गिरविले आहेत. विशेषकरून प्रशिक्षक कुलविंदर बक्शीश यांच्याकडून तिने हिंदी उच्चाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
सुमारे 28 वर्षांची आयशाने न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयाच्या जगतात पुन्हा परतण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. हरि ओम हा एक कुटुंबातील प्रेम दर्शविणारा चित्रपट आहे. या चित्रपटात रघुवीर यादव, सोनी राजदान यासारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाचा असल्याचे आयशाने म्हटले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मध्यप्रदेशात होणार आहे. भोपाळमध्ये याच्या चित्रिकरणाचा पहिला भाग पूर्ण केला जाणार आहे.