स्वतःच्या अनोख्या कानांमुळे एक महिला इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. महिलेचे कान इतके मोठे आणि लवचिक आहेत, की ती छत्री पकडण्यासाठी सेल्फी स्टिक धरण्यासाठी हातांऐवजी कानांचाच वापर करते.
टोकियोतील आयुमी ताकाडा ( Ayumi Takada )नावाच्या या माहिलेची तुलना ‘द इनक्रेडिबल्स’ ( The Incredibles ) चित्रपटातील ‘इलास्टीगर्ल’शी करण्यात येत आहे. आयुमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ती स्वतःच्या कानांच्या मदतीने एक सेल्फी स्टिक, छत्री आणि एक पेन देखील कानात अडकवताना दिसून येते. लोक या अजब घटनेला पाहून दंग होत आहेत.
आयुमीचा कान 4.5 सेंटीमीटरपर्यंत फैलावू शकतो आणि एक सेल्फी स्टिकच्या हँडलला गोल लपेटू शकतो. एका व्हिडिओ फुटेजमध्ये 37 वर्षीय आयुमी ताकडा पावसात छत्री पकडण्यासाठी देखील या प्रतिभेचा वापर करत असल्याचे आणि यादरम्यान तिच्या दोन्ही हातांमध्ये शॉपिंग बॅग असल्याचे दिसून येते.