Tarun Bharat

आयुष हॉस्पिटल, मोपा विमानतळ लवकरच सुरु

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमही उभारणार,पेडणे पालिका नव्या इमारतीचे भूमिपूजन

पेडणे /प्रतिनिधी

पुढील पाच वर्षांत पेडणे मतदारसंघाचा कायापालट होणार असून सर्वांधिक विकास प्रकल्प सुरु असलेला हा मतदारसंघ आहे. मोपा येथे उभारण्यात येणाऱया  आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले उड्डाण 15 ऑगस्ट रोजी होणार आहे, तर आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी पेडणे येथे केली.

  पेडणे पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत प्रकल्वावर एकूण 9 कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत. त्या कामाचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, मुख्याधिकारी मनिष केदार, भाजप मंडळ अध्यक्ष तुळशिदास गावस, नगरसेविका आश्विनी पालयेकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक माधवी सिनाई देसाई, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका राखी कशालकर आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गावचा विकास झाला तरच देशाची प्रगती होऊ शकते, त्यासाठी गावागावात विकासाला आपण प्राधान्य देणार आहे. पेडणेचे पुणे व्हायची गरज नाही तर पेडणे हा महाल आहे आणि तो राज्याचा श्वास आहे. आगामी काळात पेडणेचा सर्वांगीण विकास होणार आहे.

 देशाच्या विकासात राज्याचा विकास

देशाच्या विकासात राज्याचा विकास आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग जोडण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याला सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 पेडणेची कला राज्यभर पोहोचविणार : आर्लेकर

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपण बोलण्यापेक्षा विकासातून कृती करून दाखवणार आहे. त्याचेच हे ताजे उदाहरण आहे. आज पेडणे पालिका प्रशासकीय इमारतीचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली हस्तकला महामंडळाच्या चेअरमनपदी निवड केली आहे त्याला न्याय देताना पेडणे तालुक्मयातील कला पूर्ण राज्यात पोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.

सुसज्ज मासळी मार्केट उभारा : जीत आरोलकर

 मांदेचे आमदार जीत आरोलकर यांनी, पेडणे तालुक्मयाचा विकास करत असताना पेडणे शहरातील रस्त्यावर भरवला जाणारा दर गुरुवारचा बाजार इतरत्र हलवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, त्यांची सोय करावी शिवाय एक सुसज्ज मासळी मार्केट या ठिकाणी उभारावे, अशी मागणी जीत आरोलकर यांनी केली.

 यावेळी नगराध्यक्ष उषा नागवेकर यांचेही भाषण झाले. मुख्याध्यापक राजू बोंदे यांनी सूत्रसंचालन केले तर उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर यांनी आभार मानले.

Related Stories

प्रदेश काँग्रेस समित्यांची 25 एप्रिलपर्यंत पुनर्रचना

Patil_p

रावण येथील नागरिक रस्त्यावर

Omkar B

कोणत्याही क्षणी काहीही होण्याची शक्यता होती-सुधांशू सालिगुडी

Amit Kulkarni

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट

Amit Kulkarni

अरविंद केजरीवाल म्हणजे ‘छोटा मोदी’; रणदीप सुरजेवाला यांची टीका

Archana Banage

8 आमदार एकत्रित येऊन राज्यात नवीन क्रांतिकारक क्षत्रीय पक्ष स्थापन करणार

Omkar B