मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार, आयुष इस्पितळ प्रकल्पाला भेट देऊन घेतला कामाचा आढवा
प्रतिनिधी /पेडणे
धारगळ येथे 120 कोटी रुपये खर्च करुन 50 एकर जमिनीत उभारलेल्या भव्य अशा आयुष इस्पितळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी वल्ड आयुर्वेद काँग्रेसच्या समारोप सोहळय़ात व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. या इस्पितळाचा फायदा गोवा तसेच शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासाठीही मोठय़ा प्रमाणात होणार आहे. 240 खाटांचे हे इस्पितळ असून यात आयुर्वेदातील पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम असून या विद्यार्थ्यांसाठी निवासी हा?स्टेलची सोय या प्राकल्पात आहे हा प्रकल्प गोवा राज्याची शान वाढविणारा प्रकल्प ठरणार आहे असे उद्गार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काढले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुकेकुळण धारगळ येथील आयुष इस्पितळ प्रकल्पाला संध्याकाळी भेट देऊन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत तिथल्या कामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी विविध खात्याचे अधिकारी तसेच आयुष्य इस्पितळ महाविद्यालयाच्या प्राचार्य, पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, पेडणे मामलेदार अनंत मळीक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हगे, उत्तर गोवा पोलीस अधिक्षक निधीन वाल्सन, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्य प्रकल्पाचे उद्घाटन पणजीत होणार असून या इस्पितळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपण इथे आलो आहे. हे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून सुसज्ज असा इस्पितळाच्या माध्यमातून अनेक आयुर्वेदाच्या उपचार पद्धती या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच पदवी वा पदव्युत्तर आयुर्वेदाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यासाठी राहण्याची त्यांची सोय, अन्य विभाग ओपीडी आदी सुविधा लगेच सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या इस्पितळासाठी विविध सुविधाही या ठिकाणी पुरवण्याकडे सरकारने लक्ष दिले असून त्या दृष्टीने हा प्रकल्प राज्यासाठी आयुर्वेदातील महत्त्वाचा असा इस्पितळ प्रकल्प आहे. आयुर्वेदातून वेगवेगळय़ा थेरपी तसेच संशोधन विभाग याची या ठिकाणी स्थापना केली असून या माध्यमातून गोवा राज्य तसेच शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याना याचा मोठय़ा प्रमाणात फायदा होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.
इस्पितळ प्राकल्पात पेडणेकरांना नोकऱया
या इस्पितळ प्रकल्पातून पेडणेकरांना नोकऱयात प्राधान्य असेल का ? आसा प्रश्न पञकारांनी केला असता, मुख्यमंत्री डा.सावंत यांनी या इस्पितळात डा?क्टर्सची पदे ही दिल्लीच्या एम्स इस्पितळाच्या मार्गदर्शन तत्वानुसार तसेच त्यासाठी मुलाखती ह्या दिल्ली येथे घेतल्या जाणार, माञ अन्य जी नोकर भरती प्रक्रिया आहे ती राज्यात होईल. या प्रकल्पात पेडणेकरांनी नोकऱया मिळणार आहेत. त्यासाठी पदे भरण्याच्या जाहिराती दिल्या जातील त्यावेळी त्यांनी अर्ज करावेत असे सांगितले .