Tarun Bharat

बी. आय. पाटील चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी खुर्द येथील मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बी. आय. पाटील स्मृती चषक हाफपीच क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुऊवात झाली. मसणाई देवी मंदिरजवळील क्रीडांगणावर या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा पाटील, भाऊ पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाऊढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मरगाई व मातंगी देवीचे पूजन अर्चना आलगोंडी व ज्योती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बी. आय. पाटलांच्या प्रतिमेचे पूजन चेतन पाटील यांनी केले. शहीद जवान वामन जाधव प्रतिमेचे पूजन यल्लोजी पाटील, दत्ता पाटील, जयराम पाटील, बंदेनवाज सय्यद यांनी केले. सरस्वती फोटोपूजन पौर्णिमा पाटील व सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

सरस्वतीनगर येथे रुंदीकरणावेळी हुकूमशाही

Omkar B

संत निवृत्तीनाथ सोसायटीचा तिळगूळ समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

पोस्टमन चौकात जीवघेणे खड्डे

Amit Kulkarni

यमनापूरवासियांचा हिंडाल्कोवर मोर्चा

Amit Kulkarni

लोकमान्य’तर्फे सभासदांसाठी ‘धनलाभ-2023’ मुदतठेव योजना सादर

Amit Kulkarni

रामलिंगखिंड गल्लीत सॅनिटायझर फवारणी

Patil_p