Tarun Bharat

बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचा बेळगावात थाटात शुभारंभ

Advertisements

मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या हस्ते उद्घाटन : बीएससी टेक्स्टाईल ब्रँड सेवेत : मान्यवरांची उपस्थिती

प्रतिनिधी /बेळगाव

बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे नाव उत्तर कर्नाटकात प्रामुख्याने घेतले जाते. उद्योग समुहाने अनेक दर्जेदार ब्रँड बाजारात आणून व्यापार क्षेत्रात नाव केले आहे. उत्तम दर्जेदार आणि प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून जनमाणसात बीएससी टेक्स्टाईलने नाव कमावले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काढले.

वस्त्रप्रावरण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. गोवावेस येथील मिलेनियम गार्डन शेजारी उभारलेल्या बीएससी ‘द टेक्स्टाईल मॉल’चे उद्घाटन थाटात करण्यात आले. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, खासदार मंगला अंगडी, मंत्री भैरती बसवराज, आमदार अनिल बेनके, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार महादेव यादवाड, जिल्हाधिकारी नितेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी बीएससी द टेक्स्टाईल मॉल नावाने सुरू केलेल्या मॉल शोरुमचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते झाले. यावेळी शोरुममध्ये ठेवलेल्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 

मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, बी. एस. चन्नबसप्पा कुटुंबीयांनी फार कठीण परिस्थितीत टेक्स्टाईल मॉलची उभारणी केली आहे. टेक्स्टाईलची मुहूर्तमेढ दावणगेरेत झाली असले तरी तिचा विस्तार इतरत्र ठिकाणी होत आहे. भविष्यात हुबळी आणि इतर ठिकाणी देखील टेक्स्टाईल मॉल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळगावकरांच्या सेवेत विविध वस्त्र दालन दाखल

बीएससीचे प्रमुख बी. सी. चंद्रशेखर म्हणाले, महाराष्ट्र, गोवा राज्याला लागून असलेल्या बेळगावात बीएससी उद्योग समुहाने टेक्स्टाईल मॉल उभा केला आहे. त्यामुळे बेळगावकरांच्या सेवेत विविध वस्त्र दालन दाखल झाले आहे. दावणगेरी येथे वस्त्रोद्योगाची मुहूर्तमेढ रोवून बेळगाव येथे भव्य शोरुम उभारण्यात आले आहे. याठिकाणी पुरुष, महिला आणि लहान मुलांसाठी दर्जेदार वस्त्रे उपलब्ध होणार आहेत. या टेक्स्टाईलमुळे बेळगावसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ग्राहकांची सोय होणार आहे. याबरोबरच उद्योग समुहाने ऑनलाईन विक्री देखील सुरू केली आहे. या टेक्स्टाईलमुळे विविध ब्रँडेड कपडे बेळगावकरांना खरेदी करता येणार आहे.

यावेळी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईलच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. शिवाय गोव्याहून बेळगावात खरेदीसाठी येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी हा टेक्स्टाईल मॉल उपयुक्त ठरणार आहे.

मान्यवरांचे जल्लोषात स्वागत यावेळी अभियंते नीलेश काळे, राजन सोनी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुरुवातीला प्रार्थना सादर झाली. यावेळी मुख्यमंत्री टेक्स्टाईलची पाहणी करून विविध वस्त्रदालनाबाबत प्रशंसोद्गार काढले. प्रारंभी मान्यवरांचे धनगरी ढोल आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बी. एस. चन्नबसप्पा कुटुंबीय, उद्योग समुहाचे संचालक, हितचिंतक, नागरिक उपस्थित होते.

Related Stories

कला मंदिरच्या घुमट आरती स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

बेतोडा येथे फॅन पट्टय़ा पावडर कोटींग युनिटला आग

Amit Kulkarni

पुनश्च लॉकडाऊनमुळे फोंडा पोलिसांवर ताण

Omkar B

गोवा शिवसेनेकडून नऊ उमेदवारांची घोषणा

Sumit Tambekar

मडगावचे स्वतंत्र नगरसेवक महेश आमोणकर भाजपात

Amit Kulkarni

खाणींवर कायमस्वरुपी तोडगा काढा

Patil_p
error: Content is protected !!