बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आयोजित जय भारत फौंडेशन पुरस्कृत 12 व्या रोटरी वेणुग्राम बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेत बबन शिंदे, भक्ती पोटे, मनिकांत एस., प्राजक्ता शिंदे, मोनूकुमार व स्नेहा भोसले यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले आहे. तर चिमुकल्या पारस जोतिबा हुरुडे याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या वेळेत पूर्ण केली आहे. सीपीएड मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी एमएलसी व केएमएफचे अध्यक्ष विवेकराव पाटील, पुरस्कर्ते जयंतराव पाटील, सुरेश अलते, कर्नल मनोज शर्मा, रोटरी क्लबचे माजी गर्व्हनर अविनाशा पोतदार, शिल्पीत आचार्य, गौतम भट, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, डॉ. रवी पाटील, उमेश रामगुरवाडी, विजयकुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
21 किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष 34 वर्षावरील गटात बबन शिंदेने प्रथम क्रमांक, आनंद गौनकर ने दुसरा तर राकेश कुमारने तिसरा क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात भक्ती पोटेने प्रथम क्रमांक, जास्मीता कोडेनकेरीने दुसरा तर सृष्टी पाटीलने तिसरा क्रमांक पटकाविला. 10 किमी पुरुष 34 वर्षावरील गटात मनिकांत एस. ने प्रथम क्रमांक, अब्दुल सलामने दुसरा क्रमांक तर प्रथमेश परमकरने तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटात प्राजक्ता शिंदेने प्रथम क्रमांक, शाहिन शमसुद्दीनने दुसरा क्रमांक, आकांक्षा गणेबैलकरने तिसरा क्रमांक पटकाविला. 5 किमी 18 ते 34 वयोगटातील पुरुष गटात मोनू कुमारने प्रथम क्रमांक, प्रविण गडकरीने दुसरा तर शेखर काळेने तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटात स्नेहा भोसलेने प्रथम क्रमांक, समिक्षा वेताळने दुसरा क्रमांक तर प्राजक्ता मरगाळेने तिसरा क्रमांक पटकाविला.
5 किमी धावण्याच्या स्पर्धेत 5 वर्षाच्या पारस जोतिबा हुरुडेने ही स्पर्धा 0.52:54 यावेळ ही स्पर्धा पूर्ण करुन उपस्थितांकडून व आयोजकांकडून वाह वा मिळविली. य् ाावेळी पुरस्कर्ते जयंत उंबरवाडी, उमेश रामगुरवाडी, विजयकुमार पाटील, वृषभ काटेवाडी, सौरभ अस्वले, डी. बी. पाटील, महेश अनगोळकर, अश्विन हुबळी, पंकज पवार, राजेश तळेगावकर, प्रथमकट्टी, शिवानंद पाटील, अंकुश जोशी, अश्विनी पाटील, संजना भट, संगिता आचार्य, सोमनाथ कुडचीकर, रन इंडिया कंपनीचे रोहित पवार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना पदके, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब वेणुग्रामचे सर्व पदाधिकारी, रोट्रॅक्ट क्लबचे पदाधिकारी सोमनाथ कुडचीकर, रन इंडिया कंपनीचे रोहित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.