सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी न. प . नळपाणी योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल घेतली भेट
सावंतवाडी नगरपरिषदेला राज्य सुवर्ण जयंती योजनेमधून नळ पाणी योजनेसाठी बनविलेला छप्पन पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ५६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला .बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना त्यांनी या निधीसाठी प्रयत्न केला होता .मंत्री रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून हा निधी सावंतवाडी नगरपरिषदेला उपलब्ध झालाय . याबद्दल बबन साळगावकर यांनी मंत्री रवींद्र चव्हाणांची भेट घेत आभार मानले . यावेळी सोबत माजी आरोग्य सभापती विलास जाधव ,माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुरेश भोगटे ,सुंदर गावडे, सचिन माडये , एडवोकेट अनिल निरवडेकर, महेश नार्वेकर, आदी उपस्थित होते .
या चर्चेदरम्यान शिरशिंगे धरण गेले 25 वर्ष प्रलंबित असून धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. तसेच आंबोली येथील पर्यटन विकास महामंडळाने बांधलेल्या रिसॉर्टची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच कोकणातील प्रमुख उत्पन्न असलेल्या काजूला निदान पुढच्या वर्षी तरी हमीभाव महाराष्ट्र शासनाने हमीभाव मिळवून द्यावा अशी ही मागणी यावी करण्यात आली.