Baban Salgaonkar’s motion for signatures suspended
मोती तलावाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. दिनांक 26 डिसेंबर च्या आत या कामाला सुरुवात करू असे फोनवरून संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना माहिती दिली. बांधकाम लवकर सुरू होण्यासाठी साळगावकर यांच्या सहकार्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. उद्यापासून सह्यांची मोहीमही मोती तलावापाशी राबवण्याचे घोषित केलं होतं . परंतु आजच संपर्क साधून बांधकाम अधिकारी चव्हाण यांनी आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 22 डिसेंबरला वर्क ऑर्डर देणार आहे . तसेच ठेकेदारांनी तात्काळ काम सुरू करण्याचे मान्य केल्याचे फोनवरून सांगितले आहे . त्यामुळे तूर्तास हे आंदोलन स्थगित करत आहोत असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितलं .
सावंतवाडी / प्रतिनिधी