Tarun Bharat

सलग 3 शतके दुसऱयांदा झळकावणारा बाबर आझम पहिला फलंदाज

Advertisements

मुलतान-पाकिस्तान : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (107 चेंडूत 103) दुसऱयांदा सलग तीन वनडे शतके झळकावण्याचा विक्रम नोंदवल्यानंतर पाकिस्तानने विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 गडी राखून विजय संपादन केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी प्राप्त केली. बाबर आझम व इमाम-उल-हक (65) यांनी 103 धावांची भागीदारी साकारली. त्या बळावर यजमान संघाने विंडीजचे 306 धावांचे कठीण आव्हानही सहज पार केले.

विजयासाठी 306 धावांचे आव्हान असताना फखर झमान धावफलकावर 26 धावा असताना बाद झाल्याने पाकिस्तानची खराब सुरुवात झाली. मात्र. त्यानंतर इमाम-उल-हकने कर्णधार आझमसह विंडीज गोलंदाजांची चौफेर धुलाई केली.

संक्षिप्त धावफलक

विंडीज : 8 बाद 305 (शाय होप 127, ब्रूक्स 70, हॅरिस रौफ 4-77). पाकिस्तान : 5 बाद 306 (बाबर आझम 103, इमाम-उल-हक 65, अल्झारी जोसेफ 2-55).

Related Stories

प्रणॉयकडून लक्ष्य सेन पराभूत

Patil_p

बिग बॅश लीगमध्येही ‘डीआरएस’ची एन्ट्री

Amit Kulkarni

अहो आश्चर्यम्! न्यूझीलंडची विजयी गदाही 14 दिवस क्वारन्टाईन!

Patil_p

धोनी क्रिकेटमधील सर्वोत्तम सुपरस्टार

Patil_p

222 कोटींच्या बोलीसह ड्रीम 11 यंदाचे आयपीएल प्रायोजक

Patil_p

बंगाल वॉरियर्स, यु मुम्बा विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!