Tarun Bharat

मोहाली हल्ल्यामागे बब्बर खालसा

कॅनडातील लखबीर सिंह मुख्य सूत्रधार : 6 आरोपींना आतापर्यंत अटक

@ वृत्तसंस्था / चंदीगड

Advertisements

पंजाबच्या मोहाली येथील हल्ल्यात बब्बर खालसा इंटरनॅशनलचा हात असल्याचा खुलासा पोलीस महासंचालक व्ही.के. भावरा यांनी शुक्रवारी चंदीगड येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. 2017 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झालेला लखबीर सिंह या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आहे. लखबीर सिंह हा मूळचा तरनतारनचा रहिवासी होता असे त्यांनी सांगितले आहे.

लखबीर सिंह हा एक गँगस्टर असून हरिंदर सिंह रिंदाचा जवळचा सहाकरी आहे. हरिंदर सिंहचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी लागेबांधे आहेत. तर जगदीप सिंह कंग हा दहशतवाद्यांचा स्थानिक हस्तक होता. मोहाली येथील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली असून यातील तिघे जण तरनतारनचे रहिवासी असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

चढत सिंह आणि जगदीप कंग यांनी मोहालीमध्ये रेकी केली होती. तर निशान सिंहने दहशतवाद्यांना मदत केली होती. भीती निर्माण करणे हाच दहशतवाद्यांचा हेतू होता. हल्ल्यात वापरण्यात आलेले आरपीजी रशिया किंवा बुल्गारियातील असू शकते. पाकिस्तानमार्गे हा आरपीजी पंजाबमध्ये पोहोचल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे. 

पंजाब पोलिसांच्या विशेष पथकाने जगदीप सिंह कंगला दिल्लीमधून अटक केली आहे. कंगला न्यायालयात हजर केले असता 9 दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. जगदीप सिंह कंग हा एका प्रख्यात पंजाबी गायकाचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे फरीदकोट पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या निशान सिंहला मोहाली येथे आणले गेले आहे.

पोलीस मुख्यालयावरील हल्ल्याचा प्रकार गंभीर मानला जात असल्याने तपासाला वेग देण्यात आला आहे. अन्य सुरक्षा यंत्रणा देखील या आरोपींची चौकशी करणार असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यामागील सूत्रधारांचा उलगडा करण्यासाठी निशान सिंहची जबानी महत्त्वाची ठरू शकते असे पोलिसांचे मानणे आहे.

Related Stories

जगातील उंचावरील सर्वांत लांब बोगद्याचे काम पूर्ण

Patil_p

स्कुलबस बंद, मग घोडा आहेच!

Patil_p

धोका वाढला : दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.57 लाखांचा टप्पा

Rohan_P

विरोधकांकडून दिशाभूल : सीतारामन

Patil_p

आरोपींना आठवडय़ाचा कालावधी वापरू द्या

Patil_p

भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वास घेण्यास त्रास; विमानाने मुंबईतील रुग्णालयात हलवले

Rohan_P
error: Content is protected !!