बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष
► वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशातील दिग्गज वकील आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांचे बुधवारी लखनौमध्ये निधन झाले आहे. डोक्याला जखम झाल्यावर जफरयाब हे आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड देत होते.
जिलानी यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणी बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटीची बाजू मांडली होती. याप्रकरणी बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद मांडला होता. तर त्यापूर्वी उत्तरप्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ते म्हणून त्यांनी सेवा बजावली होती.
अयोध्येतील रामजन्मभूमीशी निगडित खटल्यात जिलानी यांनी मुस्लीम पक्षकाराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिल्यावर जिलानी यांना बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटीच्या अध्यक्ष करण्यात आले होते. जिलानी यांनी बुधवारी लखनौच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मुस्लीम धर्मगुरुंनी दु:ख व्यक्त केले आहे.