तरुणभारत ऑनलाइन
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.शनिवारी दुपारी सोनमने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियाद्वारे सोनम आणि आनंदने ही माहिती दिली आहे.त्या दोघांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. सोनम आणि आनंद अशी पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हीच पोस्ट शेअर करत अभिनेत्री नीतू कपूर यांनी अनिल आणि सुनीता कपूर यांचेही अभिनंदन केलं आहे.