Tarun Bharat

नवं सरकार स्थापनेनंतर मुलाखतीत काय म्हणाले बच्चू कडू; जाणून घ्या सविस्तर

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यावर खातं वाटप होणार आहे. यामध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडूंना कोणतं मंत्रिपद मिळणार, त्यांची काय इच्छा आहे, बंडात ते का सहभागी झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्य़ांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली. काय म्हणाले बच्चू कडू (Bacchu Kadu)जाणून घेऊय़ा.

…म्हणून शिंदे गटात सामील झालो

महाराष्ट्रातील, मतदारसंघातील विकास कसा करायचा याचा विचार सतत आम्ही करत असतो. मविआत अस्वस्थता होती. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) माध्यमातून ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठिंबा दिला होता. पण राष्ट्रवादीकडून मतदारसंघातील कामांसाठी निधी मिळाला नाही. सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर आता बाहेर पडण गरजेचं आहे अस जेव्हा लक्षात आलं तेव्हा शिंदे गटात सामील झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे- फडणवीस फेविकाॅल पेक्षाही मजबूत
यावेळी बोलताना ते म्हणाले, नवं सरकार हे सर्वसामान्य़ांसाठीचं आहे. आम्ही सर्वसामान्यांसाठी कामं करणार आहोत. कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष देत नाही. आमच्यासाठी मतदार संघ महत्वाचा आहे.एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हा फेविकाॅल पेक्षाही मजबूत जोड आहे. मंत्रिपदासाठी भाजपसोबत युती केली नाही. मतदारसंघातील विकास हा मंत्रिपदापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. सामाजिक न्याय खातं मिळाल्यास उत्तम अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- देवेंद्रजी वेशांतर करायचे; अमृता फडणवीसांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

सरकार अस्थिर असतं बोलावंच लागतं
युती सरकारवर शरद पवार, उध्दव ठाकरे हे टीका करत आहेत. यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, विरोधीपक्ष नेत्यांना सरकार अस्थिर आहे असं बोलावंच लागतं. आधी फडणवीस बोलतं होते आता मविआ बोलत आहे.

हेही वाचा- काय आहे कोल्हापुरातील पावसाची परिस्थिती? वाचा एका क्लिकवर

जर मंत्रिपद मिळालं तर…
एकनाथ शिंदे हे माझे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून ठाकरेंना पाठिंबा दिला होता. मतदार संघात काम करत असताना ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्या काही अपेक्षा असतात.यामुळे सत्तेत राहून किंवा सत्तेबाहेर असताना लोकांची कामे कशी होऊ शकतात हा विचार आम्ही छोटे पक्ष करत असतो. कामगार खातं असताना कोरोनाच्या काळानंतर हजार बैठका घेतल्या. या बैठकांनमधून दोन-ते तीन हजार कामगारांना न्याय दिला. आजपर्यंत १५ वर्षे आंदोलनं केली. आता पूर्ण लक्ष मतदारसंघावर केंद्रीत करायचे आहे. सत्तेच्या माध्यमातून नविन वाटचालं करणे ही गरज आहे. मंत्रिपदापेक्षा विकास होणं गरजेचं आहे. आणि तो विकास आंदोलन न करता होत असेल तर काय हरकत आहे. तो आनंद मोठा असतो. मला जर मंत्रिपद मिळालं तर सामाजिक न्याय खातं मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा

Archana Banage

आरबीआयशी चर्चेअंतीच नोटाबंदीचा निर्णय

Amit Kulkarni

गर्दी जमवल्याने ‘सपा’ला नोटीस

Patil_p

पाकिस्तान कराचीत बांधतोय मॅग्नम क्लासचे कॉर्वेट

datta jadhav

मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरून दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Archana Banage

येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल स्वस्त

Patil_p