परस्परांना भेटणे केले बंद
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडच्या सर्वात क्यूट कपल्सपैकी एक मानले जायचे. दोघांनी कधीच स्वतःच्या नात्याची जाहीर पुष्टी केली नव्हती. परंतु आता दोघांमध्ये बेकअप झाल्याची चर्चा आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांनी दीर्घकाळापर्यंत डेट केल्यावर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दोघांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघांनी अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. सिद्धार्थ आणि कियारा यांनी आता परस्परांना भेटणे बंद केले आहे. दोघेही विवाहबंधनात अडकतील असे मानले जात होते. परंतु त्यांच्या बेकअपमुळे आता त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
सिद्धार्थ लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. तर कियारा भूल भूलैया 2 या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी 2021 मध्ये शेरशाह या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तसेच चित्रपटातील त्यांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणावर पसंत केले होते.