घरात सापडली होती एके-47 अन् हँडग्रेनेड
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या मोकामाचे बाहुबली आमदार अन् राजद नेते अनंत सिंह यांना घरात एके-47 आणि हँडगेनेड हस्तगत झाल्याप्रकरणी पाटण्यातील न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एमपी/एमएलए न्यायालयाने अनंत सिंह यांना 14 जून रोजी दोषी ठरविले होते.
अनंत सिंह यांच्या घरातून एके-47 आणि हँडगेनेड हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून अनंत सिंह मागील 34 महिन्यांपासून पाटण्यातील तुरुंगात कैद आहेत. अनंत सिंह यांच्या घरात शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी एके-47 रायफल, दोन हँडग्रेनेड हस्तगत केले होते. अनंत सिंह यांना बिहारच्या राजकारणात बाहुबली नेते म्हणून ओळखले जाते.