गुवाहाटी / वृत्तसंस्था
गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱयाला मारहाण केल्याचा आरोप होता. आता दुसऱया प्रकरणातही त्यांना जामीन मिळाला असून शनिवारी त्यांची सुटका होऊ शकते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ट्विट केल्याच्या आरोपावरून आसाम पोलिसांनी 19 एप्रिलला मेवाणी यांना गुजरातमधून अटक केली होती. या प्रकरणात त्यांना सोमवारी जामीन मिळाल्यानंतर तासाभरातच महिला पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आयपीसी कलमांखाली स्वेच्छेने दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे किंवा सरकारी अधिकाऱयाला त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना 19 एप्रिल रोजी गुजरातमधील पालनपूर शहरातून अटक करण्यात आली होती.