Tarun Bharat

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना जामीन

Advertisements

दिल्ली वक्फ बोर्डातील अनियमिततेचे प्रकरण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना दिल्ली न्यायालयातून जामीन मिळाला आहे. दिल्ली वक्फ बोर्डातील कथित अनियमिततेप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर बुधवारी त्यांना अटी-शर्थींवर जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. वक्फ मंडळाशी निगडित घोटाळय़ाप्रकरणी बँक खात्यात गैरव्यवहार, मंडळाच्या मालमत्तांचा गैरवापर, वाहन खरेदीतील भ्रष्टाचार, स्वतःच्या निकटवर्तीयांच्या नियुक्तीसह 33 आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना 16 सप्टेंबर रोजी भ्रष्टाचारविरोधी शाखेने अटक केली होती. त्यांच्या निवासस्थानासह 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दोन ठिकाणांहून रोख 24 लाख रुपये आणि दोन पिस्तूल हस्तगत करण्यात आली होती. यातील एक पिस्तूल विदेशी असून ते परवानाप्राप्त नसल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले होते. 2020 मध्ये एसीबीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

एकाचवेळी दोन ‘कोर्स’ करता येणार

Patil_p

राहुल गांधींचा पंजाब दौरा, 5 खासदार अनुपस्थित

Amit Kulkarni

जगातील उंचावरील सर्वांत लांब बोगद्याचे काम पूर्ण

Patil_p

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल शपथबद्ध

Patil_p

कोरोनाच्या धास्तीने ब्रिटिश एअरवेज कर्मचारी कपात करणार

tarunbharat

हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर योगींचा इशारा; म्हणाले…

Archana Banage
error: Content is protected !!