Tarun Bharat

लाखाच्या चोरीप्रकरणी मोलकरिणीला जामीन

पुण्याहून अटक करुन आणले होते गोव्यात

प्रतिनिधी / मडगाव

 शिरवडे – मडगाव येथील गजला बेगम यांच्या घरात लाखभराचा ऐवज चारी केल्याचा आरोप असलेली अफ्साना अब्दल खलीक हिला मडगावच्या न्यायालयाने कडक अटी घालून जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

घरमालकिणीच्याच घरात सुमारे 1 लाखभराची चोरी करुन पळून गेलेल्या वरील मोलकरिणीला मडगाव पोलिसांनी पुण्यात जाऊन अटक केली होती आणि पोलीस उपनिरीक्षक यशवंत रायकर, उपनिरीक्षक दिलखुश वेळीप, हवालदार गोरखनाथ गावस, महिला पोलीस आकर्षा गावकर यांनी या मोलकरिणीला अटक करण्याच्या कारवाईत भाग घेतला होता.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार शिरवडे – मडगाव येथील गजला बेगम यांच्या घरात या मोलकरिणीने ही चोरी केल्याचा आरोप आहे. या मोलकरिणीने घर मालकीणीची नजर चुकवून सोन्याची एक साखळी, सोनेरी रंगाची एक घडय़ाळ, ऍपल ऍरपोडची जोडी मिळून सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज पळविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 381 कलमाखाली गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी पुण्याला जाऊन सदर मोलकरिणीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

गुंड ‘विकी’च्या आवळल्या मुसक्या

Amit Kulkarni

युवा शक्तीच्या आधारे राजकारणाला नवी दिशा देणार : फळदेसाई

Amit Kulkarni

ट्रक व्यावसायिक मागण्यांवर ठाम

Amit Kulkarni

म्हापसा पालिकेचे कर्मचारी सतावत असल्याचा व्यापाऱयांचा आरोप

Omkar B

अंगणवाडी सेविका आंदोलन तीव्र करणार

Amit Kulkarni

विरोधक आपल्या राजिनाम्याच्या अफवा पसरत आहे

Patil_p