Tarun Bharat

बैलहोंगलच्या कन्येचा केपीएससी परीक्षेत झेंडा

महिला विभागात प्रथम : कर्नाटकात सातवा क्रमांक, बेंगळूर येथे नियुक्ती

प्रतिनिधी /बेळगाव

दोडवाड, ता. बैलहोंगल येथील कन्येने केपीएससी परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक पटकाविला आहे. तर महिला विभागात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे तिची बेंगळूर येथे नियुक्तीही झाली आहे.

गंगा पडगुग्गरी या सामान्य कुटुंबातील तरुणीने ही कामगिरी बजावली आहे. पोलीस दलात भरती होऊन बहिस्थ परीक्षा देत केपीएससीची परीक्षा विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या या तरुणीचे कौतुक होत आहे.

सध्या बेंगळूर येथील इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स विभागाच्या असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून प्राथमिक शिक्षण दोडवाड येथे पूर्ण करणाऱया गंगाने बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून पदवीची परीक्षा दिली आहे. म्हैसूर येथे एमए इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतलेली ही तरुणी महिला विभागात केपीएससीत पहिली आली.

Related Stories

खणगाव येथे प्रचंड वाहतूक कोंडी

Omkar B

दुसऱया रेल्वेगेटनजीक वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

स्वर मल्हारतर्फे आज शास्त्रीय गायन मैफल

Patil_p

लेंढा-पंढरपूर रेल्वे सुरू करा

tarunbharat

निपाणी तालुक्यात जिंकण्याच्या इर्षेतून होतोय ‘पैशाचा चुराडा’

Omkar B

यंदा शाळांमध्येच व्हावी दहावीची परीक्षा

Patil_p