न्यूझीलंडविरुद्ध तिसरी व शेवटची कसोटी
लीड्स
येथील तिसऱया कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या सर्वबाद 329 धावांना प्रत्युत्तर देताना ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱयासमोर इंग्लंडची पहिल्या डावात 6 बाद 55 अशी दाणादाण उडाली. मात्र, त्यानंतर जॉनी बेअरस्टो (126 चेंडूत नाबाद 130) व जेमी ओव्हर्टन (106 चेंडूत नाबाद 89) यांच्या अभेद्य भागीदारीमुळे यजमान संघाने 6 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली.
हेडिंग्ले येथील या लढतीत प्रारंभी, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी व नील वॅग्नर यांच्या तिखट माऱयासमोर इंग्लंडला सातत्याने धक्के बसत राहिले होते. चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी त्यांची 6 बाद 91 अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर बेअरस्टो व ओव्हर्टनने डाव सावरला. या जोडीने सातव्या गडय़ासाठी 209 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या डावात अष्टपैलू डॅरेल मिशेल व यष्टीरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडेल या जोडीने न्यूझीलंडचा संघ 5 बाद 123 असा अडचणीत असताना सहाव्या गडय़ासाठी 120 धावांची भागीदारी साकारली.