नफा घसरणीसह 1,163 कोटी रुपयांवर
नवी दिल्ली
बजाज ऑटो चालू आर्थिक वर्षातील जूनमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत निव्वळ नफा हा काहीसा घसरलेला दिसला आहे. या घसरणीसोबत नफा 1,163 कोटी रुपयांवर राहिला आहे. पुणे येथे कार्यरत असणाऱया या कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीतील तिमाहीत 1,170 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला असल्याची माहिती आहे. कंपनीने चिपमध्ये येणाऱया कमतरतेमुळे विक्री प्रभावीत झाली व नफाही कमी राहिला असल्याचे सांगितले. भारतीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार तिमाहीच्या दरम्यान कंपनीचे उत्पन्न वधारुन 8,005 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची माहिती आहे. यासह तिमाही दरम्यान कंपनीची एकूण विक्री ही सात टक्क्यांनी घसरुन ती 9,33,646 वर राहिली आहे.