पुणे :
पुण्यातील ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटो यांनी आपला एप्रिल-जून 2024-25 चा तिमाही नफा नुकताच जाहीर केला असून नफ्यात 18 टक्के इतकी वाढ नेंदवली आहे. कंपनीने तिमाही निकालाची घोषणा मंगळवारी केली होती.
कंपनीने 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 1942 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. या तुलनेत मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 1644 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. पहिल्या तिमाहीत कंपनीने दुसरीकडे 11,932 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. जो वर्षापूर्वी याच अवधीत 10312 कोटी रुपये होता.
संगीता रेड्डीची नियुक्ती
याचदरम्यान कंपनीने 16 जुलै 2024 पासून 5 वर्षासाठी अतिरीक्त संचालक पदाची जबाबदारी संगीता रे•ाr यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या नियुक्तीला संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीचे समभाग मंगळवारी 1.45 टक्के वाढत 9815 रुपयांवर व्यवहार करत होता.