Tarun Bharat

‘बजाज’ने 75 शहरांमध्ये सुरु केली चेतकची विक्री

इलेक्ट्रिक ‘चेतक’ची मागणी वाढल्याचा परिणाम

नवी दिल्ली

 दुचाकी वाहन निर्मिती करणारी बजाज ऑटोने आपली इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये देशातील 75 शहरांमध्ये या विक्रीचे नेटवर्क तयार करण्याची योजना कंपनी तयार करत आहे. बजाज ऑटोने वर्ष 2019 मध्ये चर्चेत राहिलेले स्कूटर मॉडेल चेतक इलेक्ट्रिकमध्ये पुन्हा बाजारात आणले होते. यामध्ये सुरुवातीच्या दरम्यान याची संपूर्ण विक्री पुणे आणि बेंगळूरमध्ये होती.

कोविड19 मध्ये महामारी आल्यानंतर त्याचे बुकिंग थांबवले होते, परंतु एप्रिल 2021 मध्ये याचे बुकिंग पुन्हा सुरु झाले. यासह ग्राहकांमध्ये मोठी पसंती दिसून येत असून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बजाज ऑटोने चेतकची एकूण 8,187 इतकी विक्री केली होती.

कंपनीने वर्ष 2021-22 मध्ये आपल्या वार्षिक अहवालामध्ये  सदरच्या लोकप्रिय मॉडेलची मागणी वाढत असल्याचे दिसून आले असून आर्थिक वर्षात 20 जागी बुकिंग सेवा सुरु केली होती. तसेच आर्थिक वर्ष 2022-23मध्ये या पेंद्रांची संख्या वाढवून 75 होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चिप उत्पादनाचा प्रभाव होऊ शकतो

सेमीकंडक्टर चिपच्या अडसरामुळे उत्पादनाच्या दरावर परिणाम होऊ शकतो. तसेच पुरवठा साखळीचे संकट दूर होण्याची शक्यता कंपनीचे अध्यक्ष नीरज बजाज यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार 2,000 अब्ज डॉलर्सवर पोहचणार

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा परतली तेजी

Patil_p

ओडिसा पॉवर जनरेशनचा हिस्सा अदानी पॉवर खरेदी करणार

Patil_p

निर्यात क्षेत्रात परतले अच्छे दिन

Patil_p

कोरोनाच्या धास्तीने विस्कटली आर्थिक घडी

tarunbharat

पुढील वर्षी 20 लाख वायफाय हॉटस्पॉटस्

Omkar B