Tarun Bharat

मंडणगडात भीषण आगीत बेकरी जळून खाक, 20 लाखांचे नुकसान

प्रतिनिधी,मंडणगड

Ratnagiri : शहरातील आशापुरा स्विट्स कॉर्नर ही बेकरी मध्यरात्री 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आगीचे कारण शोधण्याचे व नुकसानीच्या अहवालाचे काम संबंधीत शासकीय यंत्रणा करत आहेत. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरातील मुख्य चौकातील व पाटरोड आणि शासकीय धान्य गोदामानजीक असलेल्या आशापुरा बेकरीतून धूर येत असल्याची बाब बसस्थानक परिसरातील एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब पोलीस व नागरिकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले. शहरातील व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. या बेकरीच्या मुख्य दरवाजाचे शटर व छताचे पत्रे काढण्यापूर्वीच आगीने रौदरूप धारण केल्याने उपस्थित लोकांची तारांबळ उडाली. यामुळे अखेर अग्निशमन यंत्रणेला पाचरण करण्यात आले. मात्र त्यापूर्वा आगीत सर्व खाक झाले होते.

या आगीत आशापुरा दुकानातील बेकरीचे पदार्थ, अन्य वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यात मालकाचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्कीटने आग लागल्याने दुकान जळले अथवा नाही यावर महावितरणकडून चौकशी सुरू आहे.
आग लागल्याने शहरातील बाजारपेठेतील व दुर्गवाडी परिसरातील विद्युत पुरवठा सुमारे आठ तासांकरिता खंडित करण्यात आला होता.
शनिवारी दुपारी 12 नंतर या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

आशापुरा बेकरी ही पाट रोडनजीक असलेल्या बाजारपेठेत दाटीवाटीच्या दुकान गाळ्यात आहे. आगीचे तीव्र स्वरुप लक्षात घेता आग पसरून पूर्ण पाट रोडलाईन येथील दुकानगाळे पेटण्याची भीती होती. मात्र घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्याने आशापुरा स्विट्स व बाजूला असलेली टपरी वगळता अन्य दुकानांना कोणतेही नुकसान झाले नाही. या बेकरीच्या भिंती इतर दुकानांच्या तुलनेने उंच असल्याने व वेळेवर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाल्याने पुढील मोठा अपघात टळला. आगीत बेकरीचे पूर्णपणे नुकसान झाले. आग आटोक्यात आणूनही आतील वस्तू आगीमुळे धुमसत होत्या. पोलीस यंत्रणा, नगरसेवक व कर्मचारी, शहर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, शहर व परिसरातील नागरिकांनी पुढाकारांमुळे आग आटोक्यात आली.

Related Stories

Ratnagiri; महाड परिसरातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Abhijeet Khandekar

‘गावठी’च्या वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Patil_p

चिपळुणात मारहाण प्रकरणी 21जणांवर गुन्हे

Patil_p

ई-पीक पाहणी कार्यक्रमावर ‘कृषी’चा बहिष्कार!

Patil_p

सावंतवाडी तालुका मराठा समाजा तर्फे २० ऑगस्ट रोजी श्रध्दांजली कार्यक्रम

Anuja Kudatarkar

फासकी लावणाऱ्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

Anuja Kudatarkar