सिंधुदुर्गातील कार्यकारिणी बदलाचेही संकेत, सभेला यायला नकार
Bala Nandgaonkar’s MNS office bearers
बाळा नांदगावकर यांनी आपल्या कणकवली दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. श्री. ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील कार्यकारिणी बदलाचेही संकेत दिले.येथील मराठा मंडळ हॉलमध्ये आयोजित मनसेच्या बैठकीला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी येण्यास नकार दिला. कार्यकर्त्यांची अशी अनास्था असेल तर राज ठाकरे यांनी का यावं?, असा सवाल माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केला. तसेच अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ दिसत नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा योग्य निर्णय पक्ष अध्यक्ष दोन दिवसात घेतील, असेही श्री नांदगावकर यांनी सांगितले.
मनसेच्या कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्याची बैठक मराठा मंडळ हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला येण्यास श्री ठाकरे यांनी नकार दिला. त्यानंतर बाळा नांदगावकर यांच्यासहित मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, माजी आमदार परशुराम उपरकर व इतर नेते उपस्थित होते.
मराठा मंडळ हॉलमध्ये आल्यानंतर श्री. नांदगावकर यांनी तीन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न केला. कार्यकर्त्यांमधील जर उत्साह असा असेल तर राज ठाकरे यांनी बैठकीला का यावे, असा सवाल त्यांनी केला. फक्त फोटो काढण्यासाठी येथे यायचं का? अशातून संघटना कशी वाढेल? याबाबत त्यांनी कानपिचक्या दिल्या.
कणकवली / प्रतिनिधी