तरुण भारत

बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुण्यात निधन

ऑनलाईन टीम / पुणे :

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisements

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत. करंदीकर यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 38 वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले होते. करंदीकर यांच्या निधानामुळे ठाकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

Related Stories

पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी खुली करा : निलम गोऱ्हे

Rohan_P

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात 6 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

राज यांच्याकडून महाआरती रद्द; मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक

Abhijeet Shinde

लष्करप्रमुखांनी घेतली पंतप्रधानांची भेट; कोरोना व्यवस्थापनात सैन्याकडून सुरु असलेल्या मदतीच्या विविध उपक्रमांवर चर्चा

Abhijeet Shinde

न्यायालयीन कामकाज 8 जूनपासून सुरू

datta jadhav

मुंबईतील अंधेरी भागात बांधकाम सुरु असणारी ४ मजली इमारत कोसळली; ५ जण जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!