Tarun Bharat

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण तापणार; वाचा थोरात,पाटील,राऊत काय म्हणाले

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआतील नेत्यांनी देवेंन्द्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी ‘मविआ’ने भाजपला आॅफर दिली. मात्र भाजपने (BJP)महाविकास आघाडीची ऑफर धुडकावली. दरम्यान भाजपनेही मविआला आॅफर दिली. मात्र त्यांनीही ही आॅफर नाकारली.सकाळपासून सुरु असलेले आॅफरचं राजकारण अखेर थांबल. आणि दोन्ही पक्ष माघार घेणार नाही या भूमिकेवर ठाम राहिले. दिवसभरात घडलेल्या या घडामोडींमुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप-सेनेत लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या बैठकिनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिल्य़ा आहेत.

भाजप तिसरी जागा जिंकणार
आता राज्यसभेच्या सहाव्या जागेचं गणित अपक्षांवरच आहे. राज्यसभेची दुसरी जागा मागे घेण्याची मविआला आॅफर दिली होती. मविआला आम्ही विधानपरिषदेत मदत करायला तयार होतो. पण त्यांनी साडेअकरा नंतर आमच्य़ाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे निवडणूक अटळ होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच भाजप तिसरी जागा जिंकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यसभा बिनविरोध करण्याचा मविआचा प्रयत्न अयशस्वी

बाळासाहेब थोरात म्हणाले, निवडणूक सुरु झाली की अनेक प्रकार सुरु होतात हि वस्तुस्थिती आहे. आणि हे टाळण्यासाठी आमच्यासारख्या जेष्ठांनी हे प्रकार टाळले पाहिजेत. जरी पक्ष वेगळे असले तरी ही लोकशाही आहे. एकत्र बसूनच यावर मार्ग निघू शकतो. आम्ही पूर्वीपासूनच हे करत आलो आहोत. मात्र राज्यसभा बिनविरोध करण्याचा मविआचा प्रयत्न अयशस्वी झाला असल्याचे थोरात म्हणाले. मविआजवळ संख्याबळानुसार मतांची आकडेवारी जादा आहे. त्यामुळे सहावी जागा मविआ लढणार आणि जिंकणार असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच भाजपकडचेही काही अपक्ष आम्हाला मदत करु शकतात. चंद्रकांत दादा म्हणतात मविआने संवाद केला नाही. मग तुम्ही का नाही केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अडीच वर्षाच्या काळात आम्ही खूप चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न
संजय राऊत म्हणाले, भाजपाने ही निवडणूक मुद्दाम लादली आहे. राज्य अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान आज संध्याकाळच्या बैठकित राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मविआतील नेत्यांची वर्षा बंगल्यावर आज बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. घोडेबाजार टाळण्यासाठी मविआचे नेते देवेंन्द्र फडणवीस यांना भेटले. राज्यसभेवरील सहावा उमेदवार निवडून येईल. पक्षांची मतं फुटणार नाहीत. अपक्ष आमदारांचा मुख्यमंत्र्यांशी चांगला संवाद आहे. मविआतील चार ही उमेदवार आम्ही निवडून आणू असेही ते म्हणाले.

Related Stories

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

datta jadhav

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे..!, मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर लाँच

datta jadhav

संभाजी भिडेंना जयंत पाटलांमुळेच क्लीनचिट : प्रकाश आंबेडकर

Abhijeet Shinde

विंटेज कार व शास्त्र प्रदर्शन

Patil_p

काबूलमध्ये पुन्हा स्फोट

Abhijeet Shinde

कुमारस्वामी यांनी सांगितली माजी पंतप्रधान देवेगौडांची अखेरची इच्छा, म्हणाले…

Sumit Tambekar
error: Content is protected !!