Balasaheb’s meeting of Shiv Sena at Malvan Wairi postponed
मालवण वायरी येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा मेळावा 20 ऑक्टोबर रोजी R. J. मंगल कार्यालय वायरी मालवण येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तातडीची कॅबिनेट मिटिंग आयोजित केल्या मुळे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री मा. दिपक भाई केसरकर उपस्थित राहू शकणार नाहीत.
या कारणामुळे सदरचा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून फुढील तारीख लवकरच जाहीर करून करण्यात येणार आहे तरी सर्व बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी आणि मालवण वासियांनी याची नोंद घ्यावी. अशी माहिती महेश राणे यांनी आचरा येथे दिली यावेळी त्यांच्या समवेत उल्हास तांडेल, किसन मांजरेकर, दीपक मिठबावकर, मयू घाडी, अश्विन हळदनकर, दीपक राऊत उपस्थित होते.
आचरा / प्रतिनिधी