Tarun Bharat

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे

Advertisements

Balasaheb’s Shiv Sena district chief Sanjay Agre

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी पाच तालुक्यांची (कणकवली व कुडाळ विधानसभा मतदारसंघ) असून जिल्हाप्रमुखपदी माजी जि. प. सदस्य संजय आग्रे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. उर्वरित तीन तालुक्यांची (सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ) कार्यकरिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सुधीर सावंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह संदेश पटेल, भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर आदी उपस्थित होते. पक्षाची महत्वाची बैठक मुख्यमंत्री कार्यालयात बुधवारी पार पडली. बैठकीस माझ्यासह मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, उद्योजक तथा पक्षाचे नेते किरणभैय्या सामंत, मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. त्यावेळी कार्यकरिणी करण्यात आल्याचे सावंत म्हणाले.

कणकवली : वार्ताहर

Related Stories

रशियाने कोरोनावरील लसीला दिली अधिकृत मंजुरी

datta jadhav

पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये दागिने लंपास

Abhijeet Khandekar

बीएमटीसी शनिवार-रविवार ४५० ते ५०० बसेस चालविणार

Archana Banage

रेल्वेकडून प्रवाशांची आरोग्यविषयक दक्षता

NIKHIL_N

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

Abhijeet Khandekar

संजय राऊतांच्या घरी ईडीचा छापा, 3 पथकांकडून तपास सुरू

datta jadhav
error: Content is protected !!