हाताने नव्हे डोक्याने खेचतात दोर
जेव्हा तुम्ही शाळा-महाविद्यालयात शिकत होत। तेव्हा रस्सीखेचची स्पर्धा निश्चित पाहिली असेल. तसेच कदाचित अशाप्रकारच्या स्पर्धेत भागही घेतला असेल. या खेळात एक मोठा दोरखंड दोन संघ दोन्ही बाजूने पकडतात आणि मिळून स्वत:च्या बाजूने खेचतात. दुसऱ्या संघाला खेचून मध्यरेषेच्या पलिकडे आणणारा संघ विजयी ठरत असतो. परंतु तुम्ही कधी टक्कल पडलेल्या लोकांमधील रस्सीखेच पाहिली आहे का? एका देशात केवळ टक्कल पडलेले लोकच या अनोख्या स्पर्धेत भाग घेतात आणि स्वत:च्या डोक्याच्या बळावर रस्सी खेचत असतात.
जपानच्या आमोरीमध्ये एक छोटे शहर असून त्याचे नाव सुऊत आहे. येथे दरवर्षी सक्शन कप टग-ऑफ-वॉर नावाची स्पर्धा आयोजित होते. या स्पर्धेत एका दोरीला सक्शन कप म्हणजेच प्लास्टिकच्या चिकटणाऱ्या कपद्वारे बांधले जाते आणि हा कप टक्कल पडलेले लोक खेचतात.
ही स्पर्धा विशेष आहे कारण यात लोक हाताने नव्हे तर स्वत:च्या डोक्याच्या मदतीने दोरी खेचतात. सक्शन कप त्यांच्या डोक्यावर चिकटविला जातो आणि मग त्याच्या मदतीने ते रस्सी स्वत:च्या दिशेने खेचतात. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरील सक्शन कप लवकर निघतो, तो पराभूत मानला जातो. या स्पर्धेत विजयी होण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या योजना आखत असतात. अनेक लोक तर डोक्यावर तेलसदृश पदार्थ लावून येतात, जेणेकरून सक्शन कप वेगाने चिकटला जावा. यंदा ही स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी आयोजित झाली असून यात मोठ्या संख्येत लोक सहभागी झाली. यंदा मिस्टर ओटा हे विजयी झाले असून त्यांनी तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले आहे.
1989 मध्ये सुऊता हागेमासू असोसिएशनने या स्पर्धेची सु रुवात केली होती. या स्पर्धेद्वारे टक्कल पडलेल्या लोकांमध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होईल अशी असोसिएशनला अपेक्षा होती. केस गळून गेल्यावर अनेकदा पुऊषांमध्ये निराशेची भावना तयार होत त्यांचे मनोबल संपून जाते. अशा स्थितीत पुऊषांना विजयीपणाची भावना जाणवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन सुरू करण्यात आले होते. आता या स्पर्धेने मोठे स्वरुप धारण केले असून याला आता नॅशनल सकर टग ऑफ वॉर टुर्नामेंटच्या नावानेही ओळखले जाते.