रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत बंदी : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी केल्या सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारने जी मार्गसूची जारी केली आहे, त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करावा, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत डी.जे.वर बंदी घालण्याचे आदेश 10 मे रोजी राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करावा, असे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत गणेशोत्सव मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी ही माहिती दिली आहे. पीओपीवरही बंदी आहे. तेव्हा गणेशमूर्ती या शाडूच्या कराव्यात, असे सांगण्यात आले. त्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. त्यामुळे यावषी हा नियम लागू करू नये. पुढील वषी त्यावर चर्चा करूया, असे सांगितले.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पत्रके देण्यात येणार आहेत. ती पत्रके कन्नडमध्ये असल्यामुळे मंडळांना समस्या निर्माण होत आहे. तेव्हा ती पत्रके मराठीतच द्यावी, अशी मागणी सुनील जाधव यांनी केली आहे. त्यावर तुम्हीच मराठीमध्ये करून घ्या, असे सांगितले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच दिल्यानंतरच गणेश मंडळांचा त्यावर विश्वास बसतो. तेव्हा मराठीतच पत्रके द्यावीत, अशी मागणी केली.
गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना लवकर सुरू करावी. गणेशोत्सवाच्या तोंडावरच रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातात. मात्र 20 दिवस आधीच हे काम पूर्ण करावे. हेस्कॉम मंडळाकडून वीजपुरवठय़ासाठी डिपॉझिट घेत आहे. ते डिपॉझिट घेऊ नये.
तसेच डिपॉझिट घेतले तरी गणेशोत्सव झाल्यानंतर दोन दिवसांतच ती रक्कम मंडळांना परत करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
शहरातील मिरवणूक मार्ग तसेच इतर मार्गावर लोंबकळत असलेल्या विद्युत तारा तसेच इतर केबल तातडीने हटवाव्यात, झाडाच्या फांद्याही तोडाव्यात, मिरवणूक सुरू असताना वनाधिकारी आणि हेस्कॉमचे कर्मचारी कामाला लागतात. त्यामुळे मंडळांना वाट पहावी लागते. तेव्हा ही सर्व कामे 15 ते 20 दिवस आधीच पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख संजीव पाटील, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिकेचे आयुक्त डॉ. रुदेश घाळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हेमंत हावळ, राजकुमार खटावकर, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे रमाकांत कोंडुसकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.