मडगाव : इंडी आघाडीच्या पाठिंब्यावर बाणावलीतील जिल्हा पंचायत पोटनिवडणूक लढविणारे आपचे उमेदवार जोसेफ पिमेंता यांनी जोरदार प्रचार चालविला आहे. आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासोबत करमणे आणि ओडली पंचायतक्षेत्रात रविवारी त्यांनी घरोघरी भेट देऊन प्रचार केला. मतदारांनी विरोधकांच्या एकतेला, इंडी आघाडीला म्हणजे झाडूला मत द्यावे, असे आवाहन उमेदवार पिमेंता करताना आढळून आले. बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे अर्ज ग्राह्य ठरले होते. त्यापैकी प्रदीप वेर्लेकर (अपक्ष) यांनी माघार घेतल्यामुळे आता फ्रँक फर्नांडिस (अपक्ष), ग्राफान्स फर्नांडिस (अपक्ष), जोसेफ पिमेंता (आप) आणि रॉयला फर्नांडिस (अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.
Previous Articleगोव्यात मागासवर्गीय कल्याण मंत्रालय स्थापनेची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.