क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे बेस्ट शुट शूटींग स्पोर्ट्स अकादमी आयोजित राज्यस्तरीय 10 मी. एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत अर्जुन शूटींग अकादमी बेंगळूर संघाने विजेतेपद तर हुबळी शूटींग अकादमीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेळगावच्या ज्योती बागेकरी, अक्षता चौगुले व गौरी हुबळी यांनी चमकदार प्रदर्शन केले.
बेंगळूर येथे झालेल्या 10 मी. एअर रायफल शूटींग स्पर्धेत बेंगळूरच्या अर्जुन शूटींग अकादमीने 1055 गुणासह प्रथम क्रमांक, 1042 गुणासह हुबळी श्यूटींग अकादमीने द्वितीय क्रमांक तर 1021 गुणांसह बेस्ट शूट अकादमी बेंगळूर संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. बेळगावचे शूटर ज्योती बागेकरीने 382, अक्षता चौगुलेने 385, गौरीने 375 गुण मिळविले. या नेमबाजांना आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या अनुराधा खुरे, समिर मुलानी, रवीचंद्रन बाळेहोसूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.