वृत्तसंस्था/ कटक
येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सुरू झालेल्या 18 वर्षाखालील वयोगटाच्या एफआयबीए आशियाई बास्केटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत बांगलादेशने विजयी सलामी देताना मालदिवचा पराभव केला.
या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बांगलादेशने मालदीववर 64-37 असा विजय मिळविला. सामन्यांच्या मध्यंतरापर्यंत बांगलादेशने मालदीववर 30-16 अशी आघाडी मिळविली होती. ओडिशाचे क्रीडामंत्री बेहरा यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाला पद्मश्री किताब विजेते दिलीप तिर्की, अखिल भारतीय बास्केटबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष अजित सिंग राठोड, ओडिशा ऑलिंपिक संघटनेचे मानद सचिव अभिजित पॉल, अशोक साहु, रंजन परिदा उपस्थित होते.