Tarun Bharat

बांगलादेशची टी-20 मालिकेत बरोबरी

वृत्तसंस्था/ हरारे

लिटॉन दास आणि मोसादेक हुसेन यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात बांगलादेशने यजमान झिम्बाब्वेचा 7 गडय़ांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या मालिकेतील पहिला सामना जिंकून झिम्बाब्वेने बांगलादेशवर आघाडी घेतली होती. रविवारच्या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकात 8 बाद 135 धावा जमविल्या. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मोसादेक हुसेनने 31 धावात 5 गडी बाद केले. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने 53 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने 17.3 षटकात 3 बाद 136 धावा जमवित हा सामना 7 गडय़ांनी जिंकला. गेल्या पंधरा आंतरराष्ट्रीय सामन्यातील बांगलादेशचा हा टी-20 प्रकारातील दुसरा विजय आहे. तर रविवारच्या सामन्यातील विजयामुळे झिम्बाब्वेची सलग सहा सामन्यातील विजयाची घोडदौड खंडित झाली. बांगलादेशच्या डावामध्ये लिटॉन दासने 33 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावा झळकविल्या. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी खेळविला जात आहे.

संक्षिप्त धावफलक ः झिम्बाब्वे 20 षटकात 8 बाद 135 (सिकंदर रझा 62, मोसदेक हुसेन 5-31), बांगलादेश 17.3 षटकात 3 बाद 136 (लिटॉन दास 56).

Related Stories

बाबर आझम पाकिस्तानचा नवा वनडे कर्णधार

Patil_p

भारत-इंग्लंड यांच्यात आज सराव सामना

Patil_p

महिला क्रिकेटपटूंना मिळणार वर्ल्ड कप बक्षीस रक्कम

Patil_p

कर्नाटकाला 198 धावांची आघाडी

Patil_p

भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

Patil_p

कसोटी फलंदाजांत लाबुशाने प्रथमच अग्रस्थानी

Patil_p