Bangladesh Crime Case : बांग्लादेशमधील झेनाईदह येथील एका हिंदू मंदिरावर हल्ला करत मूर्त्यांची तोडफोड केली आहे. याबाबत झेनाईदह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. ही घटना काल सकाळी पहाटेच्या सुमारास घडली. याबबात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. तसेच बांग्लादेशमधील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
१० दिवसांच्या वार्षिक दुर्गा पूजा उत्सवाच्या समाप्तीनंतर ही घटना घडली. यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. झेनाईदह येथील दौतिया गावात कालिमातेचे मंदिर आहे. या मंदिरात काल (ता. ७) रोजी ग्रामस्थ दर्शनाला गेले असता त्यांना देवांच्या मृर्ती भग्रावस्थेत दिसल्या.
याआधी मार्च महिन्यात ढाका येथील इस्काॅनच्या राधाकांता जीव मंदिरात अशीच तोडफोड करण्यात आली होती. आता पुन्हा बांग्लादेशात अशीच घटना घडली आहे. त्यामुळे या हल्लेखोरांना पकडा अशी मागणी हिंदू संघटनेने केली आहे.

