Tarun Bharat

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेश, आयर्लंड संघ पात्र

Advertisements

आयर्लंड संघ पात्र

वृत्तसंस्था/ अबुधाबी
 2023 साली होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश आणि आयर्लंड संघांनी आपली पात्रता सिद्ध केली. या स्पर्धेसाठी पात्र फेरीची स्पर्धा अबुधाबीत घेतली गेली. उपांत्य लढतीत बांगलादेशने थायलंडचा 11 धावांनी तर आयर्लंडने झिंबाब्वेचा 4 धावांनी पराभव केला.

बांगलादेश आणि थायलंड यांच्यातील उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 5 बाद 113 धावा जमविल्या. त्यानंतर थायलंडने 20 षटकात 6बाद 102 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात संजिदा आणि सलमा यांची कामगिरी दमदार झाली. बांगलादेशची फलंदाज रुमानाने नाबाद 28 तर मुर्शिदाने 26 धावा जमविल्या. थायलंडच्या कॅनोने 13 धावात 1 गडी बाद केला. त्यानंतर थायलंडच्या डावामध्ये चेंतामने एकाकी लढत देत 51 चेंडूत 64 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे सलमाने 18 धावात 3 तर संजिदाने 7 धावात 2 गडी बाद केले. बांगलादेशची कर्णधार नेरुमोल चेवाईने फलंदाजीत 12 धावा जमविल्या.

पात्र फेरीच्या दुसऱया उपांत्य सामन्यात आयर्लंडने झिंबाब्वेचा केवळ 4 धावांनी पराभव केला. या सामन्यात फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकात 6 बाद 137 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 20 षटकात 6 बाद 133 धावापर्यंत मजल मारली. आयर्लंडच्या डावामध्ये प्रेंडरगेस्टने 28, स्टोकेलने नाबाद 26 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या सिबांदाने 24 धावात 2 गडी बाद केले. त्यानंतर झिंबाब्वेच्या डावात मेयर्सने 39, मुसोंडाने 31 धावा केल्या. आयर्लंडतर्फे मॅग्युरीने 18 धावात 2 तर केलीने 27 धावात दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकात 5 बाद 113 (रुमाना नाबाद 28, मुर्शिदा 26, कॅनोई 1-13), थायलंड 20 षटकात 6 बाद 102 (चेंताम 64, सलमा 3-18, संजिदा 2-7). आयर्लंड 20 षटकात 6 बाद 137 (प्रेंडरगेस्ट 28, स्टोकेल नाबाद 26, सिबांदा 2-24), झिंबाब्वे 20 षटकात 6 बाद 133 (मेयर्स 39, मुसोंडा 31, मॅग्युरी 2-18, केली 2-27).

Related Stories

एचएस प्रणॉयची बॅडमिंटन संघटनेकडे क्षमायाचना

Patil_p

इंग्लंड कसोटी संघात नवोदित बेसला संधी

Patil_p

इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वी शॉ, यादव यांची निवड

Patil_p

वर्ल्ड ऍथलेटिक्सचा 5 लाख डॉलर्सचा निधी

Patil_p

केकेआरने जिंकले ‘लो स्कोअरिंग एन्काऊंटर’

Patil_p

श्रीकांत, सात्विक-अश्विनी उपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

Amit Kulkarni
error: Content is protected !!