Tarun Bharat

बांगलादेश, नेपाळचे विजय

सॅफ यू-20 फुटबॉल चॅम्पियनशिप

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

सॅफ यू-20 फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये नेपाळ व बांगलादेश यांनी विजयी सलामी दिली. नेपाळने मालदिवचा व बांगलादेशने लंकेचा पराभव केला.

नेपाळने मालदिव्हवर 4-0 अशा गोलफरकाने मात केली तर बांगलादेशने लंकेला एकमेव गोलने हरविले. दिपेश गुरुंगने नेपाळला 42 व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुगम सुवलने 57 व्या मिनिटाला, कृतिश छुंजूने 62 व्या मिनिटाला आणि जादा वेळेत मनज्ञा नाकर्मीने नेपाळचा चौथा गोल केला.

दुसऱया सामन्यात बांगलादेशचा एकमेव गोल 71 व्या मिनिटाला मिराजुल इस्लामने नोंदवला. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत बांगलादेशविरुद्ध बुधवारी होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी सहभागी झालेल्या दक्षिण आशियातील पाचही संघांच्या प्रशिक्षकांनी येथे पुरविण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांची प्रशंसा केली. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळेच आपल्या फुटबॉलपटूंची प्रगती होण्यास मदत झाली असल्याचे सांगून भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक षण्मुगम वेंकटेश यांनी ओडिशा सरकारचे त्याबद्दल आभारही मानले.

Related Stories

ख्रिस केर्न्स आयसीयूमध्ये

Amit Kulkarni

इटालियन स्पर्धेतून ओसाकाची माघार

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाला विजयाची गरज

Amit Kulkarni

अमित रोहिदासकडेच नेतृत्व, नीलमचे पुनरागमन

Patil_p

टेनिस स्पर्धेसाठी दोन हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

विराट कोहलीची घसरण, जो रुटची झेप

Patil_p