वृत्तसंस्था/ किंग्सटाऊन
बांगलादेश आणि नेदरलँड्स किंग्सटाउन येथे आज गुरुवारी होणार असलेल्या ‘ड’ गटातील महत्त्वपूर्ण लढतीत आपल्या ‘सुपर एट’मध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील. या गटातून दक्षिण आफ्रिकेने आधीच पुढील फेरी गाठली आहे आणि बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ व श्रीलंका यांच्यात दुसरे स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. श्रीलंकेवर दोन गडी राखून विजय मिळवून सुऊवात केलेल्या बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मागील सामन्यात चार धावांनी पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सही दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पराभवानंतर या सामन्यात उतरत असून तेही पुनरागमनाची आशा बाळगून असतील.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)